भिवंडी दि .कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात कलम १४४ लागू केले असून मंदिर , मस्जिद , गुरुद्वारा यांच्यासह इतर धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनासह पोलीस प्रशासनाने वारंवार केले असतानाही शासन निर्देशाची पायमल्ली करीत मस्जिद सुरू ठेवून नागरिकांना नमाज पाठणसाठी एकत्र केल्याने कलम १४४ चा भंग केल्या प्रकरणी आसबीबी मस्जिद ट्रस्टींवर गुन्हा दाखल झाल्याची घटना भिवंडीत आज घडली आहे.
आसबीबी ट्रस्टचे अध्यक्ष गुलाम अहमद खान खजिनदार मरगुब हसन अंसारी, सदस्य मोहम्मद हबीब अंसारी , हजरत अंसारी यांच्यासह इतर ट्रस्टींवरही कलम १४४ चा भंग केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी शहरात सार्वजनिक नमाज पाठणसाठी नागरिकांची गर्दी करण्यास मनाई असतांनाही अनाधिकाराने आसबीबी मस्जिद मध्ये आज मस्जिदीत ५० ते ६० नागरिक एकत्र जमवून सार्वजनिक नमाज पठण केल्याने कलम १४४ चा भंग केला. त्यामुळे आसबीबी ट्रस्टींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरपाल बारेला करीत आहेत.