भिवंडी-करोना व्हायरस चा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत असताना शासन प्रशासन जमावबंदी आदेश काढून पोलीस व स्थानिम स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गर्दी न जमविण्या बाबत समाज देत असतानाही भाजी व किराणा मार्केट मध्ये गर्दी जमत असल्याने त्यासाठी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेत महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने भाजी व किराणा विक्रेते यांची भर रस्त्यात अंतर अंतरावर उभे करून शाळा घेत त्यांना करोना व्हायरस चा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना विक्रेत्यांनी कराव्यात या बाबत मार्गदर्शन केले .
जमावबंदी आदेश देशभरात लागू केल्या नंतर ही भिवंडीत ठिकठिकाणी नागरिक भाजी किराणा औषध खरेदीच्या नावाने गर्दी करीत असल्याने त्या माध्यमातून करोना चा संसर्ग होऊ शकतो या साठी स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांनी ओरभाग समिती क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांच्या मदतीने पद्मानगर भही मार्केट येथे भाजी विक्रेते व किराणा दुकानदार यांची भररस्त्यात शाळा भरवीत प्रत्येकाने आपल्या दुकान समोर भाजी विक्रीच्या समोर रिंगण आखून ग्राहकांमध्ये अंतर बाळगणे गरजेचे असून मास्क अथवा रुमाल तोंडाला न बांधणाऱ्या ग्राहकांना भाजी अथवा किराणा माल विक्री न करण्या बाबत व प्रत्येकाने आपल्या दुकान समोर पाणी ठेवून ग्राहकांना व स्वतः आपले हात वेळोवेळी स्वच्छ करण्या बाबत च्या सूचना दिल्या ,या सूचनांना भाजी व किराणा विक्रेत्यांनी प्रतिसाद देत त्याची अंमलबजावणी करण्या बाबत आश्वासन देत भाजी मार्केट सकाळी ७ ते १०.३० व संध्याकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान उघडे ठेवण्याचे मान्य केले .भाजी व किराणा साहित्य पर्याप्त असताना ग्राहकांनी गर्दी टाळण्याचे व शिस्त पाळण्याचे आवाहन संतोष शेट्टी यांनी भाजी विक्रेते व ग्राहकांना केले .
एवढेच नव्हे तर धामणकर नाका परिसरातील सर्व बँक अधिकारी यांची भेट घेत ग्राहकांना उन्हाचा तडाखा बसू नये या साठी बँकेत ठराविक अंतर सोडून बँक ग्राहकांना बसविण्याच्या सूचना देत ग्राहकांची काळजी घ्या बाबत विशेष लक्ष दिले .
भिवंडीत भाजी विक्रेत्यांची रस्त्यावर शाळा भरवून नगरसेवकांनी दिले सामाजिक अंतर राखण्याचे धडे